मुंबई :
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्यासोबतच मिळणारा राज्य सरकारचा ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सातवा हप्ता अखेर वितरित होणार आहे. या हप्त्यासाठी तब्बल 1 हजार 932 कोटी 72 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निधी पुढील पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होईल. यामुळे राज्यातील 92.91 लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
योजनांची जबाबदारी:
शासन निर्णयानुसार, वितरित करण्यात येणारा निधी योग्य लाभार्थ्यांच्या खात्यातच पोहोचावा याची जबाबदारी कृषी आयुक्तालयावर असेल. तसेच, प्रत्येक हप्त्यानंतर बँक खात्यात उरलेला निधी आणि त्यावरील व्याज शासनाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असेल.
नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची खूप महत्त्वाची योजना आहे. याला या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे एकदम दिले जात नाहीत, तर ४ महिन्यांनी-४ महिन्यांनी २,००० रुपये करून तीन वेळा दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात वर्षाला एकूण १२,००० रुपये येतात. या पैशांनी शेतकरी शेतीचे खर्च भागवू शकतात. ही योजना पीएम किसान योजनेसारखीच आहे, पण शेतकऱ्यांना यातून जास्त मदत मिळते.
या योजनेत हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे द्यावी लागतात. जसे – आधार कार्ड, पॅन कार्ड, ७/१२ उतारा, बँक खात्याचे तपशील आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर.

आता सातव्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर, सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता ऑगस्ट २०२५ च्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण अंतिम तारीख सरकारकडून जाहीर केली जाईल.
सरकारने ही योजना २०२३ मध्ये सुरू केली. यात शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही, कारण पीएम किसान योजनेत नाव असले की आपोआप नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी ठरत आहेत. शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती असणे, महाराष्ट्रात राहणे आणि वय किमान १८ वर्ष असणे आवश्यक आहेच.
जर कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळाला नाही, तर त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या हेल्पलाइन नंबर 020-25538755 वर फोन करूनही माहिती घेऊ शकतात.
ही योजना शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत करते आणि त्यांचे दैनंदिन खर्च सोपे करते.
येथे Click करा 👉🏻 namoshetkari.com