Followers

मारुतीनं व्हिक्टोरिया SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?

 

Maruti suzuki


      मारुती सुझुकीची नवी मिडसाइज व्हिक्टोरिस SUV भारतीय बाजारात अवतरली आहे. कंपनीने ही SUV विशेष बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केल्याचे दिसते. यात, हिच्या CNG मॉडेलच्या मोठ्या बूट स्पेसचाही समावेश आहे. खरे तर या कारमध्ये कंपनीने व्हिक्टोरिसमध्ये अंडरबॉडी CNG टैंक दिला आहे. यातही, कंपनीने या कारमध्ये सिंगल CNG सिलेंडरचाच वापर केला आहे. जोक कारच्या खालच्या बाजूला बसवण्यात आला आहे. अर्थात, स्टेपनीची जागा पूर्वीप्रमाणेच राहील, याचा मोठा फायदा म्हणजे आता कारमध्ये सामान अथवा साहित्य ठेवण्यासाठी संपूर्ण बूट स्पेस मिळेल. या नव्या सेटअपसह ही कार भारतीय बाजारात टाटा हरियर, टाटा नेक्सॉन, ह्यूदाई क्रेटाच्या ड्युअल सिलिंडर टेक्नॉलॉजी कारना टक्कर देईल...


मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?


इंजिन ऑप्शन:


व्हिक्टोरिस साधारणपणे ग्रैंड व्हिटारा प्रमाणेच आहे. या कारमध्ये 3 मुख्य पॉवरट्रेन ऑप्शन देण्यात आले आहेत. यात, पहिले 103hp पॉवर असलेले 1.5-लिटर, 4-सिलिंडर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन, दुसरे 116hp पॉवर असलेले 1.5 लिटर, 3-सिलिंडर स्ट्रॉन्ग हायब्रिड सेटअप आणि तिसरे 89hp पॉवर असलेले 1.5-लिटर पेट्रोल-CNG इंजिन असे पर्याय देण्यात आले आहेत.

महत्वाचे म्हणजे, CNG व्हेरिअंटसाठी 5-स्पीड मॅन्युअल देण्यात आले आहे. व्हिक्टोरिसमध्ये ऑल-व्हील ड्राइव्हचे ऑप्शनही मिळेल. तसेच, फुल टँकमध्ये ही कार 1200Km एवढे मायलेज देईल. याशिवाय इतरही अनेक लक्झरिअस गोष्टींचा या कारमध्ये समावेश करण्यात आला आहे.


व्हिक्टोरिसचे फीचर्स :


या एसयूव्हीच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, डॉल्बी ॲटमॉस्टसह 8-स्पीकर साउंड सिस्टिम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ॲम्बिएन्ट लायटिंग, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, लेदरेट अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ८-वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हेड-अप डिस्प्ले, केबिन एअर फिल्टर, पॉवर्ड टेलगेट आणि बरेच काही समाविष्ट आहे. सेफ्टी फीचर्स व्हिक्टोरिसच्या सेफ्टी पॅकेजमध्ये, स्टँडर्डच्या स्वरुपात 6 एअरबॅग्स, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि इतरही काही सुविधा देण्यात आल्या आहेत. हिच्या हायर व्हेरिअंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि मारुती मॉडेलमध्ये पहिल्यांदाच लेवल 2 ADAS ही मिळते आहे. याशिवाय, विक्टोरिसला 5-स्टार भारत NCAP क्रैश सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.


Bootspace, comfart, Milegeच्या तुलनेत एकदम मस्त SUV....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.