GST Cut Impact: ३ आणि ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. यामध्ये जवळपास १७५ वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
जीएसटी दरांमध्ये बदल केले जाणार आहेत. यामुळे अनेक वस्तूंवरील कर कमी झाल्याने त्यांच्या किंमती १०-१२ टक्क्यांनी कमी होणार आहेत. याची अनेकजण वाट पाहत आहेत. अशातच या कोणकोणत्या वस्तू असतील असा सवाल अनेकांच्या मनात आहे. यावर आता एक मोठी अपडेट येत आहे.
३ आणि ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. यामध्ये जवळपास १७५ वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यामध्ये एसी, टीव्ही आणि सिमेंट आदी वस्तूंचाही समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर २८% वरून १८% पर्यंत कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर मोटरसायकल, स्कूटरवरील जीएसटी देखील कमी होणार आहे. सरकारने सुमारे १७५ उत्पादनांवरील जीएसटीमध्ये १०% पेक्षा जास्त कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
लहान हायब्रिड कार आणि बहुतेक मोटारसायकलींवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्याचे प्रस्तावित आहे. या वस्तू स्वस्त होणार असल्या तरी कार्बोनेटेड पेयांवरील कर ४० टक्के ठेवण्याचा प्रस्ताव आहे. तंबाखू, पान मसाला, गुटखा आणि संभाव्य ऑनलाइन गेमिंग सारख्या लक्झरी आणि वाईट गोष्टींच्या कक्षेत येत असलेल्या वस्तू, सेवा या ४० टक्के नव्या स्लॅबमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
या कंपन्यांना प्रचंड फायदा...
छोट्या पेट्रोल हायब्रिड कारवरील जीएसटी कमी झाला तर टोयोटा आणि मारुतीलाच याचा फायदा होणार आहे. कारण या दोनच कंपन्यांकडे हायब्रिड कार आहेत. टॅल्कम पावडर, टूथपेस्ट आणि शॅम्पूसारख्या पर्सनल केअरच्या वस्तूंवर जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी होऊ शकतो. याचा फायदा हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांना होणार आहे.गाड्या विकत घेणंही होणार स्वस्त:
ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलासा देण्यासाठी देखील कर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता काही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहने, जी पूर्वी 28% कर स्लॅबमध्ये होती, ती 18% स्लॅबमध्ये आणण्यात आली आहेत. तीनचाकी वाहनं, 350cc पर्यंतच्या मोटारसायकल, आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरही आता 18% जीएसटी आकारला जाईल. यामुळे ऑटो क्षेत्राला चालना मिळेल आणि ग्राहकांसाठी वाहने स्वस्त होतील.
शेतकऱ्यांनाही मोठा फायदा:
सरकारने कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता ट्रॅक्टरचे टायर आणि सुट्या भागांवरील जीएसटी 18% वरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आता ट्रॅक्टरवर 12% ऐवजी फक्त 5% कर आकारला जाईल. तसेच बयो पेस्टीसाईड्स जैव-कीटकनाशके, माइक्रोन्यूट्रिएंट्स, ड्रिप इरिगेशन सस्टम (ठिबक सिंचन प्रणाली) आणि आधुनिक कृषी> यंत्रसामग्री देखील आता 5% कर स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.
इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणंही होणार स्वस्त
एअर कंडीशनर अर्थात ए.सी. 32 इंचापेक्षा मोठे एलईडी /एलसीडी टीव्ही, मॉनिटर्स, प्रोजेक्टर आणि डिशवॉशरवरील जीएसटी आता 28% वरून 18 क्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती कमी होतील आणि घरगुती बजेटवरील भार कमी होईल. >
सरकारने केवळ कर दर कमी केले नाहीत तर संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक केली आहे. आता स्वयंचलित जीएसटी नोंदणी फक्त 3 वर्किंग डेजमध्ये पूर्ण होईल. प्रोव्हिजनल रिफंड आणि टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया देखील सोपी आणि वेगवान करण्यात आली आहे. यामुळे लघु आणि मध्यम व्यवसायांना 'व्यवसाय सुलभीकरण'चा खरा फायदा मिळेल.
दिवाळीपूर्वी देशवासियांना मोठं गिफ्ट:
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांबद्दल बोललो होतो. जीएसटी दर कपात आणि प्रक्रिया सुधारणांचा थेट फायदा हा देशातील नागरिकांना, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल. या पावलामुळे देशात व्यवसाय करणे सोपे होईल आणि नागरिकांचे जीवन सुधारेल असे त्यांनी नमूद केलं आहे.
