फुप्फुसं हा एक आपल्या शरीराचा महत्वाचा भाग
फुप्फुसं (Lungs) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे आणि वय वाढल्यावर त्यांची क्षमता हळूहळू कमी होते.
परंतु, योग्य काळजी आणि साधे-सोपे व्यायाम करून आपण फुप्फुस मजबूत ठेवू शकतो, श्वास घेण्याची ताकद वाढवू शकतो आणि अनेक आरोग्याच्या समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.
महिलांची फुप्फुसं पुरुषांच्या तुलनेत काही वर्ष आधीच सर्वोच्च अवस्थेत पोहोचतात आणि नंतर हळूहळू कमी होऊ लागतात,
या अभ्यासाचं नेतृत्व करणाऱ्या बार्सिलोना ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका ज्युडिथ गार्सिया आयमेरिच यांच्या मते, ही फुप्फुसांची कामगिरी हळूहळू कमी होणं नैसर्गिकपणे वयाशी
संबंधित आहे. धूम्रपान, हवेतील प्रदूषण आणि दमासारख्या समस्या याला अधिक वेग देऊ शकतात,
गार्सिया-आयमेरिच म्हणतात, जेवढी तुमची फुप्फुसं तरुण वयात चांगली असतील, तैवढं पुढे श्वसनाचे आजार आणि इतर फुप्फुसांच्या समस्या होण्याचा धोका कमी राहतो.
फुप्फुसांची तब्येत फक्त श्वसनावरच नाही, तर आपल्या प्रतिकारक्षमता, वजन आणि मेंदूवरही परिणाम करते. असते
फुफ्फुसांची क्षमता कशी तपासावी, त्याची काळजी कशी घ्यावी आणि वय वाढतानाही त्यांना निरोगी ठेवण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत,
आपलं फुप्फुस कसं आहे, यावरुन आपले आरोग्य किती चांगलं आहे हे समजतं. आणि ते आपण मजबूतही करू शकतो.
आपल्या फुप्फुसांचं वय किती आहे असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक
श्वासासोबत ते शूळ, प्रदूषण, सुक्ष्मजीव आणि अॅलर्जिन्ससारख्या गोष्टींचा सामना करतं, त्यामुळे फुप्फुस लवकर जुने होतात, आणि त्याचा आपल्या शरीराच्या इतर भागावरही परिणाम होऊ शकतो,
फुप्फुसांची ताकद वाढवण्यासाठी काय करू शकतो?
मग आपली फुप्फुस किती निरोगी आहेत? आणि आपण त्यांना चांगलं बनवण्यासाठी काही करू शकतो का?अशा अभ्यासांसाठी महागडी उपकरणं लागतात, पण घरच्या घरी फुफ्फुसांची चाचणी करायची असेल तर सोपा मार्ग आहे. त्यासाठी
फक्त मोठी प्लास्टिकची बाटली, एक बादली किंवा आंघोळीचा टब आणि रबरी नळी लागेल.
फुप्फुसांच्या क्षमतेचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
संशोधनात असं दिसून आलं की, वय वाढल्यावर फुप्फुस लवचिक राहत नाहीत, श्वास घेणारे स्नायू कमकुवत होतात आणि छातीची आकुंचन क्षमता मर्यादित होते. "जर फुप्फुसांची कामगिरी खूप कमी झाली, तर श्वास घेणं कठीण होऊ शकतं."
गार्सिया-आयमेरिच म्हणतात. "यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज (सीओपीडी) नावाचा आजार होऊ शकतो, ज्यात फुप्फुसं नीट काम करत नाहीत."
फुप्फुसं नीट काम करत नसल्यास फक्त श्वसनाचेच आजार नाही तर
उच्च रक्तदाब, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, वजन आणि शरीराची ताकद कमी होणं, मेटाबॉलिक आजार आणि मेंदूची क्षमता हळूहळू कमी होणं यांसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
कॅनडामधील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉन बॉडिश, जे वय आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या तज्ज्ञ आहेत, त्या म्हणतात की, फुप्फुसांचा हृदय आणि रक्तप्रवाहाशी घनिष्ठ संबंध आहे.
पुढील प्रमाणे करा
सुरुवातीला 200 मिली पाणी मोजा, ते बाटलीत ओता आणि पाण्याची पातळी मार्क करण्यासाठी पेनचा वापर करा.आणखी 200 मिली पाणी ओता, नवीन पातळी पेनने मार्क करा आणि बाटली भरत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा करा.
बकेट, बादली किंवा टब पाण्याने भरा आणि आता भरलेली बाटली त्यात उलट करून बुडवा.
बाटली उलट्या स्थितीत ठेवा, रबरी नळी बाटलीच्या तोंडात ठेवा. ती घट्ट बसण्याची गरज नाही.
दीर्घ श्वास घ्या आणि रबरी नळी फुंका
बाटलीमधून तुम्ही किती पाण्याची ओळ बाहेर फुंकू शकता, ते मोजा
पाण्याच्या ओळींची संख्या 200 मिलीने गुणा. (उदा, तीन ओळी = 600 मिली). हा तुमच्या फुप्फुसांचा क्षमतेचा आकडा आहे. ज्याला फोर्ड व्हायटल कॅपॅसिटी (एफव्हीसी) असंही म्हणतात.
फुप्फुसांची क्षमता सुधारण्याचे मार्ग
आपल्याला एकदा फुफ्फुसांची स्थिती समजली की, संशोधनानुसार काही उपाय करता येतात, ज्यामुळे फुप्फुसांची क्षमता वाढवता येते आणि वयानुसार होणारी घट कमी करता येते.
नियमित व्यायाम केल्याने श्वसनाच्या मार्गातील जळजळ कमी होते आणि श्वास घेणारे स्नायू मजबूत होतात.
आहारातील मीठ कमी करणं फायद्याचं ठरू शकतं, कारण जास्त मीठ फुफ्फुसातील जळजळ वाढवू शकतं. तसेच माशाचे तेल, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन सी व इ यांचा समृद्ध आहार फुफ्फुसांचं संरक्षण करण्यास मदत करतो.
बॉडिश सुचवतात की, फुप्फुसांचं नुकसान करणारे रसायन टाळण्यासाठी धूम्रपान आणि व्हेपिंग दोन्ही सोडावेत.
मिनेसोटा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॅनियल क्रेगहेड म्हणतात, चांगल्या फुप्फुसांची क्षमता टिकवण्यासाठी निरोगी वजन राखणं आणि जास्त चरबी टाळणं आवश्यक आहे. "पोटाची चरबी फुप्फुसांत हवा पूर्ण भरायला अडथळा आणू शकते," असंही ते म्हणतात.
परंतु, फुप्फुसांची क्षमता सुधारण्याचा आणखी एक मार्ग आहे. 1990 च्या मध्यापासून, इन्स्पिरेटरी मसल ट्रेनिंग (आयएमटी) म्हणजे श्वास घेताना प्रतिकार देणाऱ्या उपकरणातून श्वास घेणं, हा श्वसन स्नायू मजबूत करण्याचा मार्ग म्हणून ओळखला गेला आहे.
क्रीडापटू, गायक आणि दमा किंवा सीओपीडीसारख्या श्वासाच्या अडचणी असलेल्या लोकांसाठीही हे वापरलं जातं. संशोधनानं दाखवलं आहे की, आयएमटी केल्याने व्यायामाची क्षमता वाढते आणि रक्तदाब कमी होतो.
निरोगी फुप्फुसांचे फायदे
फुप्फुस आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. बॉडिश म्हणतात, जर आपण फुप्फुस निरोगी ठेवलं, तर वय वाढल्यावरही आजारी पडण्याची शक्यता कमी असते.
"वय वाढल्यावर फुप्फुसांची क्षमता कमी होते, पण जे लोक फुप्फुसांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांच्यासाठी काळजी करण्यासारखी गोष्ट नाही," असं डिकिन्सन म्हणतात.
"निरोगी फुप्फुसांमध्ये शरीराला पुरेसं ऑक्सिजन देण्याची आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्याची क्षमता असते. पण जर ही घट वेगानं झाली, तर त्याचा आरोग्य आणि जीवनमानावर परिणाम होऊ शकतो."
आपल्याला फुप्फुसांची काळजी वाटत असेल, तर डिकिन्सन
म्हणतात की, डॉक्टरकडे जा आणि फुप्फुसांची योग्य चाचणी करा. यात आपण स्पायरोमीटर नावाच्या उपकरणात श्वास घेतो, जे श्वासाचं प्रमाण आणि वेग किंवा गती मोजतं.
फुप्फुस आणि संपूर्ण रोगप्रतिकारक प्रणाली यांच्यातील संबंध 'लंग-इम्यून ऍक्सिस' (फुफ्फुस प्रतिकार अक्ष) नावाने ओळखला जातो.
फुप्फुसामध्ये लाखो रोगप्रतिकारक पेशी असतात, त्या वायू प्रदूषण साफ करतात, आजारांशी लढतात आणि श्वास घेताना होणारे नुकसानही दुरुस्त करतात," असं त्या म्हणतात.
बॉडिश यांच्या मते, जर फुप्फुसं रोगप्रतिकारक पेशी जमा झालेली धूळ आणि कण साफ करू शकले नाहीत, तर फुप्फुसात दाह-जळजळ (इन्फ्लेमेशन) वाढते. यामुळे फुप्फुसं कडक होतात आणि नीट काम करत नाहीत.
फुप्फुसातील दाह-जळजळ शरीराच्या श्वासोच्छवासाच्या आजारांवर होणाऱ्या प्रतिक्रियाही बदलू शकते आणि नुकसान वाढवू शकते.
फुप्फुसांची कमी क्षमता इतर वयानुसार हम्म होणाऱ्या आजारांपेक्षा आधी दिसू शकते, जसे की हृदयाचे आजार, ऑस्टियोपोरोसिस, हाडांचा कमकुवतपणा, टाइप 2 मधुमेह आणि स्मृती कमी होणे.
तरी या संबंधाबाबत नेमकं काय आहे, हे अद्याप समजलेलं नाही. फुप्फुसात दाह होण्याची समस्या संपूर्ण शरीरात पसरू शकते, असं बॉडिश यांना वाटतं.
येथे Click करा 👉🏻 lungsdieases.com
गायनामुळे होतो फायदा
दुसरा एक सोपा मार्ग म्हणजे गाणं म्हणणं किंवा वायू वाद्य वाजवणं, न्यूयॉर्कमधील लुईस आर्मस्ट्रॉग सेंटरमधील संशोधकांनी दमा खरच असलेल्या लोकांच्या फुप्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी त्यांना विविध वायू वाद्ये वाजवायला शिकवले.इतर शास्त्रज्ञांनी ओकारिना नावाच्या बासरीच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीची रचना केली आहे, ज्यामुळे फुप्फुसांची क्षमता वाढवता येते. होय
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कमधील सहाय्यक प्राध्यापिका आणि
स्वतः एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका असलेल्या मेटे कासगार्ड यांनी सीओपीडी असलेल्या लोकांसाठी गायन कसं फायदेशीर ठरू शकतं, यावर अनेक चाचण्या केल्या


